या सात गोष्टी नक्की तपासा जेंव्हा घेता तुम्ही जुनी गाडी

 इंजिन(Engine):- इंजिन हा गाडीचा आत्मा आहे, त्यामुळे इंजिन कसे चेक करावे प्रथम गाडीचे बॉनेट उघडा ऑइल लेवल चेक करा. ऑइल मध्ये पाणी तर मिक्स होत नाही ना खात्री करा तेंव्हाच ऑइल ची डीप स्टिक बाहेर काढल्यावर इंजिन मधून गॅसेस किंवा ऑइल बाहेर येतंय का ते पहा,



ऑइल ची लेव्हल आहे का? ते पहा गाडी स्टार्ट केल्यावर लगेच स्टार्ट होते का? हे पहा त्यानंतर गाडी मध्ये इंजिन व्यतिरिक्त दुसरा कोणता आवाज येतोय का? ते पहा गाडीच्या हेड गास्केट मधून ऑइल लीक होतंय का? ते पहा यानंतर इंजिन ची ऑइल फिलिंग कॅप उघडा आणि त्यावर हात लावून ऑइल येतंय का सोबतच गॅसेस खूप जोरात येत आहेत का ते पहा


 जर ऑइल आणि गॅस जास्त येत असेल तर त्या गाडीला ब्लॉक पिस्टन ओव्हरहॉल करणे गरजेचे आहे. सगळं ठीक असेल तर केबिन डॅशबोर्ड मध्ये RPM मीटर मध्ये जर गाडी पेट्रोल असेल तर

 1000 RPM आणि डिझेल असेल तर 750 ते 900 RPM वर गेज आहे का पहा जर ते खाली वर होत असेल तर इंजिन च्या टाईमिंग बेल्ट किंवा इंजेक्टर किंवा सेन्सर मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे खर्चाच काम आहे तसेच आता सर्व गाड्या मध्ये ECU (इंजिन कंट्रोल मोड्युल) असतोच जर इंजिन मध्ये फ्युएल एअर मिक्शर किंवा इतर काय इंजिन ची समस्या असेल तर इंजिन चेक लॅम्प लागतो जर असे असेल तर इंजिन स्कॅनर ने चेक केलेले उत्तम


     

क्लच प्लेट(Clutch Plate)- यानंतर क्लच कसा चेक करायचा ते आपण पाहूया क्लच चेक काण्याची एक सर्वसाधारण पद्धत अशी आहे कि गाडी 1st गियर मध्ये ठेऊन एक्सलेटर द्यायचे क्लच सोडून अचानक ब्रेक दाबल्यानंतर गाडी बंद पडली पाहिजे जर गाडी बंद पडण्यामध्ये थोडा वेळ लागत असेल तर क्लच प्लेट जाण्याच्या मार्गावर आहे अजून एक पद्धत गाडी सुरु असताना स्पीड वाढवल्यावर RPM वाढत असेल आणि तेवढ्या प्रमाणात स्पीड वाढत नसेल तर क्लच प्लेट चा प्रॉब्लेम आहे

 

गियर बॉक्स(Gear Box) चेक करताना गाडीचे गियर सुलभ आणि कोणताही आवाज न करता आरामात बदलले पाहिजेत गियर शिफ्टर मध्ये दोन गियर मधील अंतर जास्त नसावं 

बॉडी डॅमेज (Body Damage)यामध्ये चेक करायच्या बऱ्याच पद्धती आहेत दरवाज्याचे जे रबर Sealent असतात ते काढून आतमध्ये जंग लागला आहे का हे तपासणे.


गाडी चे फ्लोअर mattress  काढून खालील पत्रा सडला आहे का हे पाहणे जरुरी आहे. गाडीच्या बाजूला मागील बाजूला उभे राहून सरळ रेषेत गाडी पुढील दिशेने पाहिली तर आपल्याला गाडीचे सगळे बॉडी पॅनल एका रेषेत आहेत का हे दिसेल तसेच गाडीचे दरवाजे बंद असताना बाहेरून गाडीच्या दरवाजा मध्ये पिलर A B यामध्ये प्रमाणापेक्षा आणि कमी जास्त फट आहे का हे पहिले पाहिजे गाडी चे बॉनेट उघडून जिथे shocker माऊंट असतात तिथे वेल्डिंग तर केलं नाही नाही हे पहिले पाहिजे कारण समोरून जर अपघात झाला असेल तर शोकेर माऊंट जागेवरून हलतात व तिथे जास्त गॅप पडतो जो परत वेल्डिंग करून भरावा लागतो म्हणून शोकेर माऊंट पाहावे आमचेच मागील शोकेर ला देखील पाहावे जर तुम्ही बोटाने आपण दरवाजा नॉक करतो तसे प्रत्येक बॉडी पॅनल वर कथिक ठिकाणी नॉक केले तर बॉडी पॅनल मध्ये रिपेन्ट किंवा पुट्टी भरली आहे का ते कळेल

  व्हील आणि टायर(wheels & Tires) व्हील आणि टायर तपासताना प्रथम टायर वरील नक्षी पाहावी तिची झीज सामान असावी जर टायर एका बाजूने जास्त झिजला असेल तर गाडी जर चेस ची असेल म्हणजेच इनोव्हा जुनी स्कॉर्पिओ झायलो तर चेस डॅमेज असू शकते पण जर व्हील अलॉयमेंट किंवा बॅलन्सिंग नसेल तरी असा प्रॉब्लेम येऊ शकतो गाडीचे अलॉय कुठे क्रॅक आहेत का बघितले पाहिजेत


 इंटिरियर (Interior)पाहताना सीट कव्हर डॅशबोर्ड वरील सर्व कंट्रोल्स काम करत आहेत का एअर कंडिशनर गाडी थंड करतोय का तसेच हिटर गरम हवा देतोय का हे पाहणे महत्वाचे आहे

 कारण बरच लोक AC पाहतात हिटर पाहत नाहीत जर हिटर काम करत नसेल तर हिटर चे काम करण्यासाठी पूर्ण डॅशबोर्ड बाजूला काढावा लागतो आणि हे काम खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहे



 त्यामुळे हिटर सुरु आहे का हे पाहणे जरुरी आहे सीट्स मागे पुढे वर खाली होतेय का इलेक्ट्रिक सीट असेल तर नक्कीच पहा रिअर बाहेरील आरसे (OVRM) इलेक्ट्रिक अडजस्टेड असतील तर चेक केले पाहिजेत डोअर हॅन्डल ग्लास वर खाली होतायत का हे पण पहिले पाहिजे कारण आजकाल सर्वच गाड्या या पोर विंडो पोवारलोक आणि सेंसर च्या असल्यामुळे या गोष्टी परत दुरुस्त करणे कधी कधी अवघड असते पार्ट न मिळणे वायरिंग खराब होणे आणि ते जर डॅशबोर्ड च्या खाली खराब असेल तर मग ते दुरुस्त होईल का आणि झाले तर किती पैसे जातील हे सांगणे अवघड आहे त्यामुळे आधी पाहिलेलं कधी हि चांगलं

  कागदपत्रे(Documents) गाडी चांगली असली तरी तिची कागदपत्रे कायदेशीर असणे जरुरी आहे आता मोटर वाहन नियमावली खूप च कडक होत चालली आहे त्या सोबत डिजिटल पण होत चालली आहे त्यामुळे गाडीची माहित आता काही क्लीक वर वाहन विभाग आणि वाहतूक अधिकाऱ्यांना मिळते यासाठी गाडी मध्ये RC BOOk  हे त्या व्यक्तीच्या नावावर आहे का हे पाहिले पाहिजे. 


जर गाडी ब्रोकर कडून घेत असाल तर तो ब्रोकर विश्वासपात्र व माहितीचा असावा अनुभवी असावा तसेच गाडीचा इन्शुरन्स valid असावा PUC valid असावी https://vahan.parivahan.gov.in/nrservices/faces/user/citizen/createcitizenuser.xhtml 


या भारत सरकारच्या परिवहन विभागाच्या वेबसाइट वर जाऊन तुम्ही गाडी चे ओनर ची गाडी ची माहिती पडताळू शकता तसेच त्या त्या राज्याच्या वाहतूक पोलीस विभागाच्या वेबसाइट वर जाऊन त्या गाडी वर कोणता दंड आहे का हे पाहता येईल

आपल्याला जर हि माहिती उपयोगी वाटली तर आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा  

Post a Comment

Previous Post Next Post